जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवार, दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी विविध शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली. आजच्या बाजारात एकूण 11 हजार 50 क्विंटल मालाची आवक नोंदविण्यात आली असून सुमारे 7 कोटी 5 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
तुरीला आज बाजारात समाधानकारक दर मिळाला. पांढरी तूर 8,650 रुपये प्रति क्विंटल कमाल भावाने विक्री झाली, तर लाल तुरीला 8,300 रुपये दर मिळाला. कापसालाही चांगला प्रतिसाद मिळत सी.सी.आय. कापसाचा सरासरी भाव 7,954 रुपये राहिला.
सोयाबीनची 3,822 क्विंटल आवक झाली असून कमाल 6,100 व सरासरी 5,550 रुपये दर मिळाला. गहू, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, उडीद व गुळ या पिकांचीही नियमित आवक झाली. हरभऱ्याला सरासरी 5,450 रुपये तर गव्हाला 2,450 रुपये दर मिळाला.
बाजारात शेतकऱ्यांची गर्दी असून दर समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. प्रशासनाकडून सुरळीत लिलाव व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती बाजार समितीने दिली.