जालना, पुढारी वृत्तसेवाः उसतोड कामगाराच्या ट्रॅक्टरची ट्रॉली व मोबाईल चोरणाऱ्या आरोपीकडून ०६ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल मौजपुरी पोलिसांनी जप्त केला असून आरोपीस जेरबंद केले आहे.
जालना तालुक्यातील हातवण येथील शेत गट क्र १०५ मधे ऊस तोड कामगारांने २८ जुलै रोजी ट्रॅक्टर व ट्रॉली उभी करून ते रात्री गुरांना वैरण देण्यासाठी घरी गेले होते. यावेळी ट्रॅक्टरजवळ झोपलेल्या दोन मुलांचे मोबाईल व ट्रॅक्टरची ट्रॉली अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती.
या बाबतची फिर्याद मौजपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर मौजपुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन गुन्हयांचे तांत्रिक विश्लेषण करून नमूद गुन्ह्यात संशयित शिवाजी पुंजाराम खोमणे (रा. भाटेपुरी) यास ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने सदर चोरी केलेला मुद्देमाल हा बीड जिल्ह्यातील वडवणी येथे नेल्याचे सांगितले.
संशयित आरोपीने सदर चोरी ही त्याचा साथीदार परमेश्वर ऊर्फ लहानु रघुनाथ चंद (रा. मांडवा, ता.जि. जालना) याच्या मदतीने केल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी जिल्हा बीड येथील वडवणी येथे जाऊन सदर गुन्ह्यातील त्याचा साथीदार व चोरी गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली व मोबाईल असा ६ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणात गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. सदर आरोपीना गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीची दोन दिवस पोलिस कोठडी मंजूर केली असून आरोपितांकडून अन्य वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येतात काय ? याबाबत सखोल तपास करीत आहोत.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्र पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, पोउपनि विजय तडवी, ग्रे. पोउपनि प्रकाश जाधव, सहायक फौजदार ज्ञानोबा बिरादार, जमादार राजेंद्र देशमुख, महिला पोलिस कमचारी रंजना चव्हाण, भगवान खरात, प्रदीप पाचरणे, अविनाश मांटे, प्रशांत म्हस्के यांची उपस्थिती होती.
सदर आरोपीना गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीची दोन दिवस पोलिस कोठडी मंजूर केली असून आरोपितांकडून अन्य वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येतात काय ? याबाबत पोलिस तपास करीत आहेत.