Tower wire stealing gang arrested
बदनापूर, पुढारी वृत्तसेवाः इलेक्ट्रिक लाईटच्या टॉवरवरील तार चोरणारी टोळी बदनापूर पोलिसांनी जेरबंद केली असून या टोळीच्या ताब्यातून १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बदनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दावलवाडी शिवारात बी. एन. एस. पॉवर लिमिटेड कंपनीचे नवीन टॉवर उभे करण्याचे काम सुरू आहे. डावरगाव येथील महादेव मंदिराच्या मागील डोंगरात असलेल्या दोन टॉवर मधील ३ लाख रुपये किंमतीची अंदाजे १६०० मीटर अॅल्युमिनियमची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबतची माहिती फोन वर बदनापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करीत एक काळ्या रंगाची कार संशयितरीत्या जाताना पाठलाग करून पकडली.
या कारमधे एक अल्युमिनियम तारेचे बंडल, हेक्सा ब्लेड, दारी आदी साहित्य मिळून आले. या प्रकरणी कंपनीचे सुपरवायझर नीलेश खुशाल जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक एम.टी. सुरवसे, पोलिस उपनिरीक्षक संतोष कुकलारे, जमादार नितीन वाघमारे, पोलिस कर्मचारी पी. के. गोलवाल यांनी कारवाई केली.
पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांच्य मार्गदर्शनाखाली पथकाने दोन संशयितांना अटक करून १ लाख ८० हजार रुपयांची अॅल्युमिनियम तार व एक काळ्या रंगाची स्कार्पिओ असा १९ लाख ८० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.