

Fire breaks out in four shops; estimated loss of Rs 7 to 8 lakhs
अंबड, पुढारी वृत्तसेवाः अंबड शहरातील बसस्थानका समोरील कोर्ट रोडवर कॉर्नरवर असलेल्या चार दुकानांना गुरुवार (११) रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत सुमारे ७ ते ८ लाखांचे नुकसान झाले. अग्नीशामक दलाने ही आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजु शकले नाही.
अंबड शहरातील बसस्थानकासमोरील कोर्ट रोड कॉर्नरवरील अजय जैन यांच्या पारस पान सेंटर, सुरेश चौधरी यांचे गुरुदत्त लॉन्ड्री, जितेंद्र व सुरेश तंगडपल्ली यांचे बालाजी हेअर सलुन, मंजीत वाघमारे यांचे संतसेना हेअर सलुन या दुकानांना गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत पारस पान सेंटरमधील फ्रिजसह इतर वस्तु जळुन तीन लाखाचे, गुरुदत्त लॉन्ड्रीचे दिड लाख, बालाजी हेअर सलुन व संतसेना हेअर सलुन यांचे प्रत्येकी दोन लाख रुपयांचे अंदाजे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
आगीचे वृत्त समजताच अंबड येथील अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला. यावेळी अग्नीशमन दलाचे जयसिंग चांगले, सय्यद अफसर, एजाज अली यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत आगीमुळे मोठे नुकसान झाले होते. आगीमुळे छोट्या व्यावसायीकांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. आग लागल्यानंतर या भागातील विद्युत पुरवठाही काही काळ खंडीत झाला असल्याचे पैकावयास मिळाले. अचानक लागलेल्या या आगीबाबत नागरीकांमधे उत्सुकता आहे. शॉर्टसर्कीटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
नागरीकांची गर्दी
घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. हनुमान धांडे, केदार कुलकर्णी, कुमार रुपवये यांच्यासह मान्यवरांनी घटनास्थळी भेट देउन आग विझविण्यासाठी मदत केली. महसुल विभागाच्यावतीने आगीचा पंचनामा करण्यात आला असुन अंबड पोलिस ठाण्यातही आगीची नोंद करण्यात आली आहे. या आग कशामुळे लागली हे समजु शकले नाही.