Sexual Abuse | नात्याला काळीमा फासणारी घटना : मामाच्या मुलाकडूनच अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण  File Photo
जालना

Women Exploitation Cases : महिलांच्या शोषणात होतेय वाढ, गत सहा महिन्यांत १९४ विनयभंगांचे गुन्हे दाखल

समाजाची संवेदना जागृत होण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

increase exploitation women, 194 cases of molestation have been registered in the last six months

जालना, पुढारी वृत्तसेवा: महिलांशी संबंधित असलेल्या हुंडाबळी, विनयभंग, बलात्कार आदी घटनांवर आळा बसण्यासाठी शासन कोटी-कोटी रुपये खर्चुन विविध योजना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गाव पातळीवर राबवित आहेत. परंतु, यानंतरही प्रशासन महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यात अपयशी ठरत आहे. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत विनयभंगाचे १९४ गुन्हे दाखल झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत महिलांवर होणाऱ्या विविध प्रकारच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत चालली आहे. अत्याचारामध्ये कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, हुंडाबळी, कामाच्या ठिकाणी शारीरिक शोषण, युवती, महिलांकडून पाहून खुलेआम होणारी अश्लील शेरेबाजी, दुकानातील छोट्या चेंजिग रुममध्ये छुप्या कॅमेऱ्यातून तयार होणाऱ्या 'व्हिडीओ क्लिप' आदी विविध प्रकारांतून महिला युवतींचे शोषण होत आहे.

दुसरीकडे शासनाच्या विविध विभागामार्फत महिलां, युवतींवरील अत्याचार रोखण्यासाठी शासन आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. यासाठी स्वयंसेवी संस्था, बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महिला मंडळ, पुरुषांचे विविध बचत गट, शाळा, महाविद्यालयांच्या मदतीने जनजागृती करण्यात येत आहे. तर प्रशासनाच्या महिला बालकल्याण विभागाला याबाबत वेगळा निधीच येतो.

या निधीतून जनजागृती करून अशा घटनांवर आळा बसण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. परंतु, संबंधित विभाग केवळ कागदोपत्रीच हे उपक्रम राबवितात. यामुळे अजूनही गुन्ह्यांची संख्या कमी होऊ लागली नाही. दिवसेंदिवस वाढत असलेल्या या घटनांमुळे महिला, युवतींना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर नियंत्रण यावे, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात गत सहा महिन्यांत विनयभंगांचे १९४ गुन्हे दाखल आहेत. दाखल सर्व गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास करण्यात आला आहे. त्यातील ९४ टक्के प्रकरणांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

क्रीडा प्रबोधनीतील मुलींशी गैरकृत्य

जालना शहरातील निवासी क्रीडा प्रबोधनीत व्यवस्थापकांकडूनच गैरकृत्य केल्याची तक्रार मुलींनी केली होती. या प्रकरणी व्यवस्थापक प्रमोद गुलाबराव खरात यास पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडीही सुनावली आहे. सध्या ६ मुलींचेही जबाब घेण्यात आले आहे. सीसीटीव्ही नसलेल्या रुममध्ये नेऊन तो अंगावर हात फिरवत असल्याचा त्याचावर आरोप आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

महिला, मुलीविषयक दाखल तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला जातो. सखोल तपास करून दोन महिन्यांच्या आतच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाते. महिलांविषयक गुन्ह्यांत वेळेत दोषारोपपत्र दाखल व्हावे, यासाठी संबंधित ठाणे प्रमुखांनाही वेळोवेळी सूचना दिल्या जातात.
अजयकुमार बन्सल, पोलिस अधीक्षक, जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT