There is a possibility of a decrease in pigeon pea crop yield
डोणगाव, पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद तालुक्यातील डोणगावसह शिवारात तूर पीक सोंगणीच्या कामाला वेग आल्याचे दिसून येत आहे. उत्पन्नात घट होण्याची शक्यता असून अपेक्षित भाव मिळण्याची शेतकरी यांना अपेक्षा आहे.
डोणगाव परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून नागरणे, वखरणी, खुरपणी रासायनिक खते, शेणखत, कीटकनाशक फवारणी अशा विविध प्रकारे शेतीचे कामे करून तूर पिकाची लागवड करण्यात आली होती.
तर काही शेतकऱ्यांनी कपाशी, भुईमूग, सोयाबीन आंतर पिकात लागवड करून चांगल्या पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. तूर लावण्यात आली होती. शेतात तूर काढण्याची लगबग सुरू आहे. वातावरणातील बद्दलामुळे उत्पन्न घट होण्याची शक्यता आहे.
शेती काम करण्याकरिता शेतीमध्ये मजुरांची टं चाई निर्माण होत असल्याने काही शेतकरी स्वतः शेतीत राबवून व काही शेतकरी मजुरांच्या भरवशावर असल्याचे दिसून येते. यामुळे शेती व्यवसाय परवडत नसल्याने शेतकरी म्हणत आहे.