Water Supply : नवीन जालना विभागाचा पाणी-पुरवठा दोन दिवस विस्कळीत File Photo
जालना

Water Supply : नवीन जालना विभागाचा पाणी-पुरवठा दोन दिवस विस्कळीत

घाणेवाडी ते जलशुद्धीकरण केंद्र दरम्यानची गळती रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

पुढारी वृत्तसेवा

The water supply in the New Jalna area will be disrupted for two days

जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि पाण्याची नासाडी रोखण्यासाठी जालना शहर महानगरपालिकेने संत गाडगेबाबा जलाशय (घाणेवाडी) ते जलशुद्धीकरण केंद्र दरम्यानच्या मुख्य पाईपलाईनवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या तांत्रिक कामामुळे सोमवार, दि. ५ रोजी सकाळी पाणीपुरवठा वाहिनी बंद ठेवली जाणार आहे.

घाणेवाडी जलाशयाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर दोन ते तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ५ जानेवारी रोजी सकाळी ही मुख्य लाईन बंद करून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे.

पाणीपुरवठा उशिरा होणार असल्याने नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा आणि महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जालना शहर महानगरपालिका यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

दोन दिवस उशिराने होणार पाणीपुरवठा

मुख्य जलवाहिनी बंद राहणार असल्याने प्रामुख्याने नवीन जालना विभागातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होईल. दुरुस्तीच्या कामामुळे या भागातील पाणीपुरवठा नियोजित वेळेपेक्षा एक ते दोन दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT