The mountainous region is covered in greenery in Shravan, tourists crowd to the Kalikamata-Jalicha Dev area
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील धावडा, मेहगाव, वाढोणा, जाळीचा देव परिसरातील कालिंका माता गड व जाळीचा देव परिसर श्रावण महिन्यात हिरवाई नटला असून डोंगरदऱ्यातील हिरवाळीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.
परिसरातील डोंगर भाग हिरवाईने नटला असून रिमझिम पावसामुळे जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहे. धावडा, मेहगाव, वडाळी परिसरात गे-लेले अजिंठ्याचे डॉगर या परिसरात निसर्ग सौंदर्य वाढवणारे आहे. भागाला लाभलेला हा अमूल्य नैसर्गिक ठेवा जालना, छञपती संभाजीनगर, जळगाव जिल्ह्याचे खरेतर निसर्ग वैभव आहे. धावडा परिसरातील सिडीघाट धबधबाचा मनमोहक निसर्ग रम्य वातावरण अणि कोसळ-णाऱ्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत असून दररोज पर्यटकांची संख्या वाढत आहे. युवक धबधब्याचा आनंद भोजनाचा आस्वाद घेतात. त्यामळे दररोज पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी दिसून येत आहे.
दरम्यान मराठवाडा, विदर्भ, खान्देश विभागाच्या सिमावर्ती डोंगर पट्ट्यात म्हणजे भोकरदन तालुक्यातील उत्तरेकडील सिमावर्ती भाग हा अजिंठ्याच्या डोंगर रांगाणी व्यापलेला आहे. पच्छिमेकडुन पूर्वेकडे असा हा विस्तीर्ण डोंगरपर्वत रांगा असून यात जवळपास २० किलोमीटरच्या डोंगराळ भागात अत्यंत विलोभनीय निसर्गाचे विहंगम व डोळ्याचे पार्णे फेडण्यासारखे, 'सौंदर्य पहायला मिळत, या ठिकाणी उंच उंच डोंगर रांगात्यातून खळखळत जाणारी मेहगाव नदी तसेच अनेक छोटे मोठे नाले झरे सोबत हिरवाईने नटलेली घनदाट झाडी लक्ष वेधून घेत आहे.
निसर्गाचे वैभव
या ठिकाणी उच उंच डोंगर रांगात्यातून खळखळत जाणारी मेहगाव नदी तसेच अनेक छोटे मोठे नाले झरे सोबत हिरवाईने नटलेली घनदाट झाडी विविध पशु पक्षाच्या किलबिलाट आणि उंचावरून कोसळणारे धबधबे धावडा गावापासून अवध्या तीन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत मेहगाव नदीच्या काठावर वसलले छोटेस मेहगाव आजही दुर्लक्षित आहे. मात्र या परिसरात निसर्गाचे वैभव दिसून येत आहे.