

Emphasis on improvement of health facilities: mla Santhosh Danve
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा व कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी असल्यास त्या कळवाव्या जेणेकरून सदर रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी व महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून आपल्याला लाभ मिळवून देता येईल, असे आवाहन आ. संतोष दानवे यांनी केले.
भोकरदन पंचायत समितीत तालुक्यातील आशा सेविकांची त्रैमासिक आढावा बैठक पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आमदार संतोष पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आरोग्यसेवांचा आढावा घेत आशा सेविकांशी स्नेहसंवाद साधला व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
दरम्यान आशा सेविका भगिनींनी रक्षाबंधनचे औचित्य साधत माझ् औक्षण केले व राखी बांधली त्यांच्या या स्नेहपूर्ण कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना उत्तम्म आरोग्यसेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषत सदस्या आशा पांडे, गटविकास अधिकारी महेंद्र साबळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल कोल्हे, डॉ सुमित सावंत, आरोग्य अधिकारी जाधव, पाणी गुणवत्ता तज्ञ चित्राल यांच्यासह पदाधिकारी, कार्यक उपस्थित होते.