Jalna Crime : 'त्या' अल्पवयीन मुलीला आणले सुखरूप घरी, मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई  File Photo
जालना

Jalna Crime : 'त्या' अल्पवयीन मुलीला आणले सुखरूप घरी, मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई

आष्टी येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पुणे येथे पळवून नेणाऱ्यास तब्बल चार वर्षानंतर पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे.

पुढारी वृत्तसेवा

The man who abducted a minor girl from Ashti has been arrested by the police from Pune after four years.

जालना, पुढारी वृत्तसेवा : आष्टी येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पुणे येथे पळवून नेणाऱ्यास तब्बल चार वर्षानंतर पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

दरम्यान, आष्टी येथील एका अल्पवयीन मुलीस सेलगाव ता. परतूर येथील एका मुलाने २८ एप्रिल २०२१ रोजी फूस लावून पळवून नेले होते. अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिट कक्षाकडे तपासावर असलेल्या गुन्ह्यापैकी आष्टी येथील हा गुन्हा देखील ऐरणीवर होता. या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु बराच कालावधी होऊन गेला तरी पीडित मुलगी व आरोपी मिळून न आल्याने पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाने गुन्हयाचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता.

या गुन्ह्यामध्ये अँटी ह्यूमन ट्रैफिकिंग युनिट कक्षाने तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारांकडून आरोपी व पीडिता यांची माहिती काढली. यावरून आरोपी व पीडित हे चाकण, ता. खेड, जि. पुणे येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती जालना येथील अँटी ह्यूमन ट्रफि किंग युनिटला मिळाली. पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सुगावा काढला. पथकाने चाकण पुणे येथून अल्पवयीन मुलगी व आरोपी यास ताब्यात घेतले. गुन्हयातील पीडित व आरोपीस पुढील तपास कामी संबंधित पोलिस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे.

दरम्यान, तब्बल चार वर्षांनंतर अल्पवयीन मुलगी आणि आरोपीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथून ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी, पोलिस निरीक्षक पंकज जाधव (स्थागुशा) यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी ह्यूमन ट्रैफिकिंग युनिट कक्षाचे प्रभारी अधिकारी दीपाली शिंदे पोउपनि रवींद्र जोशी, सपोउपनि संजय गवळी, पोहेकॉ कृष्णा देठे, पोहेकॉ सागर बावीस्कर (स्थागुशा), संदीप मान्टे (सायबर), महिला अंमलदार संगीता चव्हाण, आरती साबळे, रेणुका राठोड व चालक पोलिस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी केलेली आहे.

चाकणमधून ताब्यात

अल्पवयीन मुलगी आणि आर- ोपी दोघे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण येथे राहत होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्य माध्यमातून दोघांचा सुगावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT