

Three accused arrested in cable theft case, valuables worth Rs 1.40 lakh seized
परतूर, पुढारी वृत्तसेवा
परतूर तालुक्यातील खांडवी येथे सोलर प्लांटवरील केबल चोरीप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
परतूरचे पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांना माहिती मिळाली की, खांडवी येथे सोलर प्लांटमधील चोरी ही संशयित आरोपी समीर काळे व त्याच्या साथीदाराने केली आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी समीर काळे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर चोरी त्याचे साथीदार सय्यद असेफ व शेख गौस यांच्यासह केल्याची कबुली दिली.
तपासात आरोपींनी तालुक्यातील मसला शिवारातील टाटा सोलार यासह इतर ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला १ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजयकुमार बसंल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे परतूरचे पोलिस निरीक्षक एस.बी. भागवत, पल्लेवाड, पोउपनी, अंमलदार अशोक गाढवे, गजानन राठोड, ज्ञानेश्वर वाघ, नरेंद्र चव्हाण, राम हाडे, विजय जाधव, गोविंद पवार, अच्युत चव्हाण, नितीन बोंडारे यांनी केली आहे.
परतूर तालुक्यात बसविण्यात आलेल्या विविध गावांतील सोलर प्लांटवर केबल व बॅटरी चोरीसह इतर गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने पोलिस अलर्ट मोडवर आहेत. खांडवी येथील घटनेनंतर चोरट्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.