The Jafrabad police have seized twelve stolen two-wheelers during the blockade.
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवाः जाफराबाद पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान चोरीच्या बारा दुचाकी जप्त केल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे तालुक्यातील चोरीच्या दुचाकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यात दुचाकी चोरीचे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा या निमीत्ताने ऐकावयास मिळत आहे. या कारवाईत सुमारे ३ लाख ३० हजाराच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
जाफराबाद पोलिसांनी गेल्या महिनाभरात नाकाबंदी आणि तांत्रिक तपासा दरम्यान बारा दुचाकी जप्त केल्या आहेत. यात दुचाकी चोरणाऱ्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत केवळ वाहने जप्त करण्यावरच पोलिसांनी भर दिला नसुन संशयितांवरही तातडीने गुन्हे दाखल करण्याची कार्यवाहीही करण्यात आली.
यामुळे वाहन चोरांच्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये स्प्लेंडर प्लस, फॅशन प्रो, शाईन, एच.एफ. डिलक्स अशा मॉडेल्सचा समावेश आहे. यातील अनेक दुचाकी जालना, बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून चोरीला गेल्याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक एस.एस. जाधव, पोउपनि आर.डी. पठाडे, पोउपनि व्ही. आर. पवार, जमादार अनया डोईफोडे, पोलिस कर्मचारी विजय जाधव, अनिल दूरे, कमलाकर लक्कस यांनी केली.
दुचाकी चोरीच्या पार्श्वभुमीवर नागरीकांनी सार्वजनीक ठिकाणी दुचाकी उभी करतांना काळजी घ्यावी, असे अवाहन पोलिस सुत्रांनी केले आहे. दुचाकी चोरीचा छडा लावल्या बद्दल जाफराबाद पोलिसांचे कौतुक होत आहे.