The District Collector visited and offered prayers at Shri Rajureshwar temple
जालना, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील राजूर येथे श्री गणेश जयंती निमीत्त गुरुवारी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी श्री राजुरेश्वर गणपतीचे दर्शन घेऊन विधीवत पूजा केली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज श्री क्षेत्र राजूर येथील प्रसिद्ध श्री महागणपती राजूरेश्वर मंदिराला भेट देऊन गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात विधीवत पूजा-अर्चा करून जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
श्री गणेश जयंती निमीत्त राजुर-`श्वर मंदीरात विविध धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री गणेश जयंतीचे औचित्य साधुन जालना जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर व इतर ठिकाणाहुन आलेल्या भाविक भक्तांनी श्री गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी पुजा साहित्य, पानफुल व प्रसादाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.