

Deprived of the ladki bahin scheme Jafrabad
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ जाफराबाद तालुक्यातील अनेक महिलांना अद्याप मिळालेला नाही. विशेष म्हणजे, केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जाफराबाद तालुक्यातील महिलांनी वारंवार चौकशी करूनही एकात्मिक बालविकास कार्यालयाकडून ठोस माहिती मिळत नाही, असा आरोप लाभार्थी महिलांनी केला आहे. तालुक्यात नेमक्या किती महिला पात्र आहेत, किती अपात्र ठरल्या आहेत, तसेच किती महिलांच्या खात्यात लाभ जमा झाला आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. महिलांनी तालुकास्तरावर विचारणा केली असता, "जिल्ह्याच्या एकात्मिक बालविकास कार्यालयात जाऊन चौकशी करा" असे उत्तर दिले.
जात असल्याने सामान्य महिलांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन चौकशी करणे आर्थिक शारीरिकदृष्ट्या कठीण असल्याचे वास्तव आहे.