Jalna News : कडक उन्हात मका काढणीची लगबग file photo
जालना

Agricultural News : कडक उन्हात मका काढणीची लगबग

भाव नसल्याने शेतकरी हतबल, भाव वाढीची मागणी, तापमानाचा पारा ४२ अंशांवर

पुढारी वृत्तसेवा

The corn harvest is underway in the scorching sun

पिंपळगाव रेणुकाई. पुढारी वृत्तसेवा भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात सध्या उन्हाचा पारा चांगलाच तापला आहे. दुपारी ४१ ते ४२ अंश सेल्सिअस तापमानात शेतात उभे राहणेही मुश्किल झाले आहे. मात्र नाइलाजास्तव शेतकरी व मजूर मका काढणीसाठी शेतात राबत चित्र दिसत आहे.

पिंपळगाव रेणुकाई परिसरात यंदा पाऊस चांगला झाल्याने विहिरीना मुबलक पाणी असल्याने रब्बी हंगातील मकाची पीकाचे क्षेत्र वाढले होते. सध्या रब्बी हंगामातील मका आता काढणीला आली आहे. थ्रेशरच्या साहाय्याने मका काढण्याची लगबग सर्वत्र सुरू आहे. सकाळी लवकर व सायंकाळी उशिरापर्यंत शेतकरी व महिला मजूर घाम गाळत आहेत.

डोक्यावर ऊन आणि पायाखाली तापलेली जमीन अशा परिस्थितीत दिवसभर काम करावे लागत आहे. एकरी वीस ते पंचवीस क्विंटल उत्पादन झाले तरी मकाला बाजारात मात्र अपेक्षित भाव मिळत नाही. सध्या १६०० ते १८०० रुपये क्विंटलने मक्याची खरेदी सुरू आहे. खत, बियाणे, मजुरी, थ्रेशरचा खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हातात काहीच उरत नाही. त्यामुळे उत्पादन चांगले होऊनही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

"उन्हात जीव जाळून मका काढला, पण भावच नाही. मग जगायचं कसं?" असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. शासनाने हमीभावाने मका खरेदी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

खर्चही निघेना एक एकरमध्ये मका पिकाचे २० ते २५ क्विटल उत्पादन होत आहे. परंतु खर्च वजा मकाचे पीक भाव नसल्यामुळे परवडत नाही. खर्चही निघने अवघड झाले आहे. शासनाने मका पिकाला योग्य भाव देण्यात यावा, अशी मागणी आहे.
- शुभम देशमुख शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT