Hingoli news | रासायनिक खतांच्या किमतीचा भडका

सरकारच्या धोरणामुळे बळीराजा संकटात, लागवड खर्च वाढणार
Fertilizer
FertilizerPudhari
Published on
Updated on

हिंगोली : सरकारकडून शेतकरी हिताचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. रासायनिक खतांच्या २० ते ३० टक्क्यांपर्यंत किमती वाढल्याने बळीराजासमोरील संकट गडद झाले आहे. यंदाच्या हंगामात खतांच्या किमती वाढल्याने लागवड खर्चात वाढ होणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

मागील आठ ते दहा वर्षांपासून सातत्याने रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशकांच्या किमतीत वाढ होत आहे. परिणामी शेतीचा व्यवसाय तोट्यात जातो आहे. कृषीप्रधान देश असलेल्या भारतात सातत्याने शेतकऱ्यांना आसमानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. मागील तीन वर्षांपासून कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे बनले आहे. परंतु, आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांसमोरील अडचणी कशा वाढतील हेच सरकारकडून पाहिले जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दिवसेंदिवस लागवड खर्च वाढत असून उत्पादनात मात्र मोठी घट होत आहे. बी-बियाणे, खते, कीटकनाशकांच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु,

हळदीमुळे वाढला खताचा वापर

सांगलींनंतर हिंगोली जिल्ह्यात हळदीची लागवड झपाट्याने वाढत आहे. हळद उत्पादकांचा जिल्हा म्हणून हिंगोलीची ओळख झाली आहे. हळदीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची मागणी वाढली आहे. यंदा जवळपास ६० हजार हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड होणार असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्क्यांपेक्षा अधिक मागणी प्रशासनाला नोंदवावी लागणार आहे. हळदीसह ऊस, केळीला देखील मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची गरज असते. परिणामी, रासायनिक खतांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आता रासायनिक खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

खताच्या किमतीचा तक्ता:

खताचा प्रकारजुनी किंमतनवी किंमत २०.२०.०.१३१४५०१८००१०.२६.२६१९५०२२५०२४.२४.००२०००२२००१९.१९.१९१८५०२३००पोटॅश१८५०१९७५

शेतीमालाचे दर मात्र जैसे थेच आहेत. महागाईचा विचार करता शेतीमालाला अद्यापही किफायतशीर दर मिळत नाहीत. एकीकडे वाढलेला लागवड खर्च व दुसरीकडे उत्पादनात झालेली घट आणि शेतीमालाला मिळत नसलेल्या भावामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी आधार देण्यासाठी खते बियाणे व कीटकनाशकांच्या खरेदीत अनुदान देण्यासह शेतीमालाला लागवड खर्चावर आधारित भाव देणे गरजेचे बनले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news