जालना : महापालिकेच्या जलकुंभातील पाण्यात आढळळा युवकाचा मृतदेह  pudhari photo
जालना

जालना : महापालिकेच्या जलकुंभातील पाण्यात आढळळा युवकाचा मृतदेह

पुढारी वृत्तसेवा

जालना, पुढारी वृत्तसेवाः शहरातील नुतननवसाहत भागातील विसावा शाळेजवळ असलेल्या जलकुंभातील पाण्यात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या जलकुंभातुन नुतन वसाहत भागातील चार प्रभागात शनिवारी व रविवारी पाणी पुरवठा केल्यानंतर अनेक नागरीकांच्या पाण्यात माणसाचे केस व इतर अवयवासह पाण्यास प्रचंड दुर्गंधी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

जुना जालन्यातील नुतन वसाहत भागात असलेल्या विसावा शाळेजवळील जलकुंभातुन प्रभाग क्र. २७, २८, २९व ३० मधील मंमादेवी नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, राहुल नगर, लहुजी नगर, नुतन वसाहत, जमुना नगर, विद्युत नगर, बैंक कॉलनी, म्हाडा कॉलनी रेवगाव रोड, आनंद नगर, अंबड रोड भागास पाणी पुरवठा केला जातो. रविवारी सकाळी नुतनवसाहत भागात पाणी पुरवठा करण्यात आल्यानंतर त्यात आळ्या, किडे व केस आल्याने नागरीकांमधे खळबळ उडाली.

पाण्याच्या टाकीमध्ये काहीतरी सडले असल्याचा संशयी नागरिकांना आल्यानंतर नागरीक हंडे घेउन रस्त्यावर उतरले. या जलकुंभातुन होणारा पाणीपुरवठा गेल्या दोन दिवसापासून दुर्गंधीयुक्त आणि दूषित होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.

दरम्यान, या जलकुंभात त्याच भागात राहणाऱ्या एका युवकाचा मृतदेह असल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. हा इसम चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या जलकुंभातील पाणी उपसण्याचे काम सुरू करण्यात आले असून, त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे.

जलकुंभात असलेले पूर्ण पाणी रिकमे झाल्यानंतर जलकुंभ साफ करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. जलकुंभात आढळून आलेल्या इसमाने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. येथील पाण्याच्या टाकीमध्ये व्यक्तीचा मृतदेह सापडल्यामुळे सदरील पाण्याची टाकी स्वच्छ होईपर्यंत कोणीही पाणी पिण्यासाठी वापरू नये असे अवाहन करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकारानंतर शहरातील जलकुंभाच्या सुरक्षीततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसत आहे. जलकुंभात मृतदेह आढळुन आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने घातपात करण्याच्या दृष्टीने काही पदार्थ जलकुंभात टाकल्यास अनर्थ घडु शकतो.

जालना शहरातील अनेक वार्डात अनेकदा दुषीत व दुर्घधीयुक्त पाणी पुरवठा होतो. नुतनवसाहत भागात घडलेल्या प्रकारामुळे नागरीकामधे खळबळ उडाली आहे. नुतन वसाहत भागातुन झालेल्या दुषीत पाणी पुरवठ्या नंतर अनेकांना उलटी व मळमळ झाल्याचे ऐकावयास मिळाले.

जलकुंभावर सीसीटीव्ही बसविणार शहरातील नुतन वसाहत भागातील घटना दुर्देवी आहे. या घटनेंनंतर जलकुंभावर सीसीटीव्ही बसविण्यात येणार असुन जलकुंभाच्या पायऱ्याला गेट लावुन त्या बंद करण्यात येणार आहेत. ज्या नागरीकांना नुतन वसाहन भागातुन पाणी पुरवठा झाला त्यांनी पाणी पिण्यासाठी न वापरता ते फेकून द्यावें
संतोष खांडेकर, आयुक्त महापालिका जालना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT