बीड : पुरुषोत्तमपुरीत गोदावरीच्या पाण्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह ३६ तासानंतर सापडला

बीड : पुरुषोत्तमपुरीत गोदावरीच्या पाण्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह ३६ तासानंतर सापडला
Published on
Updated on

बीड, पुढारी वृत्तसेवा : माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे शुक्रवारी (दि.११) सकाळी ९ च्या दरम्यान एका भाविकाचा गोदावरी नदीच्या पाण्यात अंघोळ करण्यासाठी गेला होता. यात तो बुडाला असल्याची माहिती त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकांनी दिली होती. या भाविकाचा स्थानिक भोई व बीड, माजलगाव , जालना एनडईआरएफची टीम शोध घेत होती. त्या भाविकाचा शोध शनिवारी स्थानिक भोई लोंकाच्या टिमला सायंकाळी ८ च्या दरम्यान लागला.

तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे अधिक मास असल्याने या ठिकाणी जत्रेचे स्वरूप आले होते. या ठिकाणी भारतभरातून भाविक दररोज लाखाच्यावर येत होते. यात शुक्रवार रोजी मारोती खवल (वय ४५ रा.पाटोदा ) येथील भाविक पुरुषोत्तम पुरी येथे दर्शनासाठी आले होते. ते दर्शनापूर्वी गोदावरी नदीत अंघोळ करण्यासाठी गेले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले होते.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news