The bad condition of the kukadi asadi road
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील वाकडी -आसडी, वाडी खुर्द या शिवापर्यंत पांणद रस्त्याचे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या पांणद रस्त्यावर बैलगाडी तर सोडा निट पायी चालता येईना अशी परिस्थितीत निर्माण झाली आहेत.
वाकडी ते आसडी, वाडी खुर्द या शिवापर्यत पांणद रस्त्याचा कामासाठी शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत जवळपास ३२ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये रुंदीकरण, माती मुरूम कामा टाकण्यात काम गेल्या काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. परंतू संबंधित गुत्तेदारांनी या पांणद रस्त्याचे थातूरमातूर काम करुन बिल काढले आहेत. या पाणंद रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि शेतातील मालाची वाहतूक सुकर होईल अशी अशा होती, परंतु हे या निकृष्ट कामामुळे शेतकऱ्यांना निट पायी चालता येत नाही, तर बैलगाड्या कशा चालतील असा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे या भागात शेती करण्याकरता जाणाऱ्या शेतकऱ्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे अशी ओरड शेतकरी करत आहे. शेतीची कामे योग्य त्या प्रकारे पावसाळ्यात करता यावी या करता मोठ्या प्रमाणावर शिवपांदण रस्ते तयार करण्याची मोहीम राबवित असताना शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला आहे. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी या कामाला विरोध केला होता, तरी हे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
या पांणद रस्त्याच्या कामाबाबत आमदार संतोष दानवे यांना देखील संबंधित गुत्तेदाराला २० फुट रुंद करून काम अतिशय चांगल्या दर्जेदार करण्याची सूचना दिली होती, तरी देखील गुत्तेदारांनी आपली मनमानी करून जवळपास १० ते १२ फुट रुंद करून रस्त्याचे थातूरमातूर काम केले आहे.