जालना-देऊळगाव राजा मार्गावर भीषण अपघात; बापलेक ठार file photo
जालना

जालना-देऊळगाव राजा मार्गावर भीषण अपघात; बापलेक ठार

जालना-देऊळगाव राजा मार्गावरील खामखेडा पाटीजवळ मंगळवारी (दि.१०) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला.

पुढारी वृत्तसेवा

Terrible accident on Jalna-Deulgaon Raja road; Father and son killed

जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : जालना-देऊळगाव राजा मार्गावरील खामखेडा पाटीजवळ मंगळवारी (दि.१०) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कुंभारझरी येथील विनोद उत्तम चव्हाण (वय ३४) व त्यांचा लहान मुलगा युवराज विनोद चव्हाण (वय ९) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा शौर्य विनोद चव्हाण (वय ११) हा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जाफराबाद तालुक्यातील पूर्णा नदीज-वळील खामखेडा पाटी परिसरात हा अपघात घडला. विनोद चव्हाण हे आपल्या दोन मुलांसह दुचाकीवरून जाफराबादहून जात असताना समोरून येणाऱ्या टाटा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की विनोद चव्हाण व त्यांचा मुलगा युवराज यांचा जागीच दरम्यान, अपघातानंतर मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण कुटुंबीय जाफराबाद येथून गौरीशंकर मंगल कार्यालय येथे लग्नसमारंभासाठी जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

शौर्यची प्रकृती चिंताजनक

या दुर्घटनेत जखमी झालेल्या शौर्य चव्हाण याला तातडीने उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT