Jalna Bribe Case : तहसीलदार विजय चव्हाण यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी File Photo
जालना

Jalna Bribe Case : तहसीलदार विजय चव्हाण यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

रोख रकमेसह सोने व चांदीचे दागिने जप्त

पुढारी वृत्तसेवा

Tehsildar Vijay Chavan remanded in police custody for two days

अंबड, पुढारी वृत्तसेवा अंबडचे तहसिलदार विजय चव्हाण यांना शनिवारी वाळु वाहतुकदारांकडुन ६ लाख ४० हजाराची लाच घेतांना बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडून सातारा पोलीस स्टेशन छत्रपती संभाजी नगर येथे गुन्हा दाखल करून त्यांना आज रविवारी दि. ७ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक बीड पथकाने केलेल्या झाडाझडतीत त्यांच्या घरातुन १ लाख ४६ हजार ८०८ रुपये रोकड रोख रक्कम तसेच ८.८ तोळे सोने, तसेच ८० ग्राम चांदी मिळाल्याची माहीती एसीबी बीडचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ली यांनी दिली आहे.

अंबड येथील तहसिलदार विजय चव्हाण यांना शनिवार दि.६ जून रोजी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने वाळु वाहतुकदारांच्या हायवा व ट्रक सुरु ठेवण्यासाठी लाच घेतल्याच्या आरोपावरुन श्रीमती माधुरी केदार कांगणे, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर, शशिकांत शिंगारे अप्पर पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजी नगर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले, अमलदार मच्छिंद्र बिडकर, प्रदीप सुरवसे, अमोल खरसाडे, चालक अंबादास पुरी या एसीबीच्या बीड युनिटने रंगेहात पकडले होते. त्यानंतर तपासणीत त्यांच्याकडे रोख १ लाख ४६ हजार ८०८ रुपये तसेच सोने व चांदीचे दागीने मिळाल्याची माहीती उपअधीक्षक एसीबी बीड यांच्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान विजय चव्हाण यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याने या दोन दिवसाच्या कोठडीत त्यांच्याकडे असलेली अन्य काही प्रत्यक्षदर्शी व निनामी मालमत्ता, वाहने व इतर काही अन्य ठिकाणचे रोख रकमेचे घबाड मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT