अंबड येथील प्राचीन बारवांचे सर्वेक्षण File Photo
जालना

अंबड येथील प्राचीन बारवांचे सर्वेक्षण

महाराष्ट्र बारव मोहिमेच्या बारव संवर्धन मोहिमेचा उपक्रम

निलेश पोतदार

Survey of ancient stepwells in Ambad

जालना, पुढारी वृत्तसेवा अंबड तालुक्यातील वारवांचे दस्तऐवज तयार करण्यासाठी मुंबई येथील चेंबुर ट्रॉम्बे न एज्युकेशन सोसायटी वास्तुकला महाविद्यालयाच्या ६४ विद्यार्थ्यांचा चमू अंबड येथे २० जानेवारी रोजी दाखल झाला आहे.

बारव अभ्यासक रामभाऊ लांडे यांच्या माध्यमातून कांवदी, पुष्कर्णी तसेच पानमळ्यातील बारवांना भेटी देऊन बारवांचे मोजमाप तसेच आतील संरचनेच्या नोंदी विद्यार्थी घेत आहेत. भविष्यात बारवांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी दस्तऐवजाचा उपयोग होणार आहे.

मुंबई येथील सी.टी.ई.एस वास्तुकला महाविद्यालयाचे प्रा. उमेश मल्या, प्रा जयराज, प्रा. रोहन जाधव, प्रा. तन्वी जोशी, प्रा. अरुण चोपडा, प्रा. मेघना सावंत, प्रा. सेमतिका मौर्या यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुकला विद्यार्थी बारवांचे वेगवेगळ्या भागाची, मोजणी करुन छायाचित्र, स्केचेस संकलन करीत आहेत. अंबड बरोबर जालना शहरातील पलंग बारव, देवी दहेगाव येथील बारवांचे सर्वेक्षण सदरील विद्यार्थ्यांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT