Job Application : नोकरीसाठी २० नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करा file photo
जालना

Job Application : नोकरीसाठी २० नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करा

नोकरीसाठी अर्जाचा नमुना शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहील.

पुढारी वृत्तसेवा

Submit applications for the job by November 20

जालना, पुढारी वृत्तसेवा : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ अंतर्गत दाखल खून अथवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय/निमशासकीय सेवेत नोकरी देण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडील शासन निर्णय दि. २० नोव्हेंबर २०२५ अन्वये तरतूद करण्यात आलेली आहे.

सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार, शासन निर्णय लागू होण्यापूर्वी घडलेल्या प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाने नोकरी मिळण्यासाठी शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

त्यानुसार, अशा प्रकरणांतील पात्र वारसांनी शुक्रवार, दि. २० पर्यंत मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांच्यामार्फत विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

नोकरीसाठी अर्जाचा नमुना शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट-४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहील. अधिक माहितीसाठी व अर्ज सादर करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. अनिता राठोड, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT