Illegal Liquor Seized : राज्य उत्पादन विभागाने पकडली अवैध दारू file photo
जालना

Illegal Liquor Seized : राज्य उत्पादन विभागाने पकडली अवैध दारू

घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथे कारवाई

पुढारी वृत्तसेवा

State Production Department seizes illegal liquor

जालना, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने १ लाख ८४ हजार २५० - रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली.

जालना येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाच्या मार्गदर्शनाखाली घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव येथे परराज्यातील अवैधरीत्या मद्याची विक्री करणाऱ्या विरोधात कोरड्या दिवसाच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली.

राणी उंचेगाव येथे पत्र्याच्या शेडमधे एक इसम गोवा राज्यातील निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला मद्यसाठा महसूल बुडून अवैधरीत्या बाळगून अवैधरीत्या विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने छापा टाकून पत्र्याच्या शेडमध्ये गोवा राज्यात निर्मिती व विक्रीकरिता असलेल्या १६ हजार २०० रुपयांची डॉ.डि.ए.एन चॉईस माल्ट विस्कीच्या १०८ सीलबंद बाटल्या, ३६ हजार २५० रुपयांच्या रॉयल स्टॅग व्हीस्की च्या १४५ सीलबंद दारू बाटल्या, २१ हजार २०० रुपयांच्या ईम्पीरील ब्लू व्हिस्कीच्या ९६ सीलबंद दारू बाटल्या, १० हजार ५६० रुपयांच्या मॅकडॉल नं १ व्हिस्कीच्या ४८ सीलबंद दारू बाटल्या, ६९ हजार १२० रुपयांच्या देशी दारू सखु संत्राच्या ८६४ बाटल्या, ६ हजार रुपयांच्या ईम्पीरील ब्लू व्हिस्की व रॉयल स्टेंट विस्कीच्या रिकाम्या बाटल्या, २५ हजारांचा मोटोरोला कंपनीचा एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.

ढाब्यावर अवैध दारू

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शहरालगतच्या ढाब्यासह ग्रामीण भागातील ढावेही तपासणी करणे गरजेचे आहे. अनेक ढाब्यांवर अवैध दारू विक्री होत असल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT