Jalna Accident News : भरधाव कार दुभाजक ओलांडून पलटली; तीन जण जखमी file photo
जालना

Jalna Accident News : भरधाव कार दुभाजक ओलांडून पलटली; तीन जण जखमी

धुळे-सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

Speeding car crosses divider and overturns; three injured

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन खड्यात पलटी झाल्याची घटना धुळे सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री जवळ मंगळवार, दि. १२ रोजी रात्री १०:३० वाजता घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहे.

आशुतोष दिलीप जाधव २५, केदार संजय पठाडे २८ व ओम बाळासाहेब चव्हाण २३ तिघेही रा.टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर असे जखमींची नावे आहे. छत्रपती संभाजीनगर कडे भरधाव वेगाने जाणारी कार क्रमांक एम एच २० सी एच ०९७३ ही भरधाव वेगाने जात असताना कार चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार दुभाजक ओलांडून पलटी झाली. या अपघातात कार मधील दोन जण गंभीर जखमी झाले तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT