Soybean Price : जालना मोंढ्यात सोयाबीन, मकाची आवक वाढली, भावात चढ उतार  Pudhari File Photo
जालना

Soybean Price : जालना मोंढ्यात सोयाबीन, मकाची आवक वाढली, भावात चढ उतार

२५ ते ३० हजार क्विंटलची आवक, सोयाबीनचे भाव वाढण्याची आशा

पुढारी वृत्तसेवा

Soybean, Maize arrival increased in Jalna Mondha, Price ups and downs

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना मोंढ्यात सध्या नवीन सोयाबीनची आवक वाढली असून दररोज २५ ते ३० हजार क्विंटलची आवक होत आहे. पाऊस थांबल्यामुळे शेतकऱ्यांकडून सोयाबीन सोंगणी वर भर दिला जात आहे. त्यामुळेच सोयाबीनची आवक वाढली आहे. सध्या ओला सोयाबीनची आवक होत असल्याने भावात चढ उतार दिसून येत आहे.

जालना मोंढ्यात तेलमील, बिल्टी खरेदीदारांकडून नवीन सोयाबीनची खरेदी होताना दिसून येत आहे सोयाबीन चे भाव ३६०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल मिळत असून दिवाळी नंतर सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता जाणकार वर्तवीत आहेत. मोंढ्यात येत्या आठवड्यात सोयाबीनीची आवक वाढण्याची शक्यता असल्याने भाव कमी होण्याची शक्यता आहे.

जालना मोंढ्यात सध्या नवीन ओली मकाची आवक दररोज १२००ते १५०० क्विंटलची होत आहे. मकाची आवक राजूर, बदनापूर, टेंभुर्णी, सिंदखेड राजा, दे राजा व जालना परिसरातून होत आहे मका ओली येत आल्यामुळे मकाला भाव कमी मिळत आहे. भविष्यात मकाचे भाव वाढणार असल्याची शक्यता आहे.

मकाचे भाव प्रतिक्विंटल ११०० ते २१०० मिळत आसल्याची माहिती अडत व्यापारी माधव इंगळे यांनी दिली. जालना मोंढ्यात सध्या रब्बी बाजरीची आवक दररोज ५०० ते ६०० क्विंटल होत आहे. बाजरीची आवक राजूर, बदनापूर, जालना परिसरातून होत आहे. थंडीची चाहूल लागताच किरकोळ किराणा दुकानदाराकडून बाजरीची मागणी होताना दिसून येत आहे. ऊसतोड कामगारांकडून बाजरीला मागणी होत आहे. बाजरीचे भाव प्रतिक्विंटल अवरेज बाजरी १९०० ते २०००, मध्यम बाजरी २३०० ते २६००, वेस्ट बाजरी २६०० ते २८०० आहेत.

ज्वारीचे भाव स्थिर

मोंढ्यात सध्या ज्वारीची आवक दररोज १३०० ते १५०० क्विंटलची होत असून भावात मोठी तफावत जानवत आहे. ज्वारीचे भाव कमीत कमी २००० रुपये असून जास्तीत जास्त ४००० पर्यंत भाव मिळत आहे. या भावामुळे शेतकरी वर्ग गोंधळात पडले आहे. अॅवरेज ज्वारीला गुजरातकडून अधिक मागणी मिळत आसल्याणे भावही चांगले मिळत आहे. बेस्ट ज्वारी ला मुंबई, पुणे, नाशिक कडुन मागणी होताना दिसून येते. ज्वारी चे भाव २००० ते २५००, मध्यम ज्वारी २५०० ते २८००, बेस्ट ज्वारी २८०० ३३००, मध्यम दुध मोगरा ज्वारी ३००० ते ३५००, बेस्ट दुधमोगरा ३५०० ते ४००० प्रतिक्विंटल मिळत असल्याची माहिती अडत व्यापारी संजय कानडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT