Sorghum Pudhari
जालना

Jalna News : बाजार समितीत ज्वारी गेली भाव खाऊन

ज्वारीला ५१५१, तर तुरीला ७९१९ रुपये दर

पुढारी वृत्तसेवा

Sorghum has gone up in price in the market committee

जालना, पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिती, जालना येथे बुधवारी (दि. २७) विविध शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून ज्वारीला सर्वाधिक ५ हजार १५१ रुपयांचा कमाल दर मिळाला. बाजार समितीत एकूण ९ हजार ७९२ क्विंटल शेतीमालाची आवक नोंदविण्यात आली.

बाजार समितीच्या दैनिक अहवालानुसार, गव्हाची २ हजार ७७क्विंटल आवक झाली असून त्याला प्रतिक्विंटल २ हजार १०० ते २ हजार ४७५ रुपये दर मिळाला. ज्वारीची २ हजार २८९ क्विंटल आवक झाली असून सरासरी ३ हजार २०० रुपये भाव मिळाला. हिरव्या बाजरीला सरा सरी २ हजार ३०० रुपये दर मिळाला.

तूर बाजारातही तेजी कायम असून पांढऱ्या तुरीला ७ हजार ९१९ रुपये, तर लाल तुरीला ७ हजार ९२५ रुपयांचा कमाल दर मिळाला. हरभऱ्याला ५ हजार ७५० रुपये, तर उडदाला ७ हजार ४६१ रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

सोयाबीनची १ हजार २७ क्विंटल आवक झाली असून त्याला सरासरी ७हजार ५० रुपये दर मिळाला. मक्याला २ हजार रुपयांपर्यंत, तर गुळाला ४ हजार ७७५ रुपयांपर्यंत भाव मिळाला. दिवसाभरातील एकूण व्यवहारांचे मूल्य तब्बल ३ कोटी ६९ लाख ३५ हजार ५२५ रुपये इतके नोंदविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT