वादळी वाऱ्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान file photo
जालना

वादळी वाऱ्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान

आन्वासह शिंगाडे पोखरी, देवठाणा येथील शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड; मदतीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Solar Power Projects Suffer Extensive Damage Due to Stormy Winds

आन्वा, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील आन्वासह, वाकडी, जानेफळ गायकवाड परिसरात गुरुवार, दि. १९. राजे रोजी झालेल्या जोरदार वादळी बाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सौर ऊर्जा पॅनलच्या साहित्यांचे मोठे नुकसान झाले असून, याचा फटका शेतकन्यांना बसला आहे.

अचानक आलेल्या वादळामुळे अनेक ठिकाणी सोलर पॅनेल उखडून पडले आहे. काही ठिकाणी पॅनेल तुटल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी उभारलेल्या सौर पंप आणि लहान सौर प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे पॅनेलचे स्टैंड वाकले, तर काही ठिकाणी संपूर्ण संरचना कोसळल्याची माहिती मिळत आहे.

या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. एकीकडे उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्याची गरज वाढत असताना सौर पंप बंद पडल्याने सिंचनावर परिणाम होत आहे. दुसरीकडे दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

जानेफळ गायकवाड परिसरात झालेल्या जोराच्या वाऱ्यामध्ये पुंडलिक यादव सोनवणे या शेतकन्यांच्या शेतातील गट नंबर २४५ मध्ये सोलर पॅनलबर वाऱ्यामध्ये सोलरच्या शेजारील लिंबाचे इसडाची दंग तुटून पडली आणि सोलर पॅनलचे नुकसान, सोलर पॅनल निकामी झाली. नुकसानीचा पंचनामा सुरू करण्यात आला असून संबंधित विभागाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

शिंगाडे पोखरीत नूकसान; भरपाई देण्याची मागणी

पांगरी: जालना तालुक्यातील शिंगाडे पोखरी येथील गट क्रमांक ३१ मध्ये नारायण देवराव शिंगाडे यांच्या शेतात विहिरीवर महावितरण कडुन शक्ती कंपनीचे पाच एचपीचे सोलार पॅनलचे नुकसान झाले आहे. पॅनलची किंमत चौदा हजार रुपये असल्याचे शेतकरी शिंगाडे यांनी सांगितले. दरम्यान संबंधित कंपनीने नविन पॅनल बसवून देण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT