गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेत खरेदीचा उत्साह file photo
जालना

Jalna News : गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेत खरेदीचा उत्साह

सोने, चांदीसह दुचाकी व चारचाकी वाहनांची विक्री

पुढारी वृत्तसेवा

Shopping excitement in the market on the occasion of Gudi Padwa

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरात गुढीपाडव्यानिमित्त दुचाकीसह चारचाकी, सोने तसेच चांदी खरेदीचा उत्साह नागरिकांमधून दिसून आला. गुढी पाडव्याच्या दिवशी जवळपास पंचवीस कोटीच्यावर खरेदी झाल्याचा अंदाज आहे.

जालना शहरात गुढी पाडवा व ईद सणामुळे बाजारपेठेत चांगली उलाढाल झाली आहे. कपडा, इलेक्ट्रॉनिक्स, दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. शहरातील विविध कंपनीच्या दुचाकी शोरुममधून गुढीपाडव्यानिमित्त ५०० दुचाकींची विक्री झाली आहे. सोने व चांदीचे भाव कमी झाल्याने गुरुवारी सोने व चांदी खरेदीचा उत्साह दिसून आला.

गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचे भाव १ लाख ५७ हजार ७१० तर २२ कॅरेटचे दर १ लाख ५० हजार २०० रुपये होते. चांदीचे भाव २ लाख ५० हजारावर होते. सोने व चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चढ उतार होत असल्याने नागरिकांमध्ये सोने व चांदी खरेदीबाबत सांशकता असल्याने त्याचा असर सोने व चांदी खरेदीवर झाल्याचे दिसून आले.

गुढीपाडव्याच्या दिवशी नागरिकांनी सोने व चांदी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र मोठ्या खरेदीऐवजी नागरिकांचा कल किरकोळ खरेदीकडे असल्याचे दिसून आले. गुढीपाडव्यानिमित्त साखर गाठी, आंब्याची पाने, फुले, वेळू यांचीही चांगली विक्री झाली. ग्रामीण भागातून आलेल्यांना यातून चांगला व्यवसाय मिळाल्याचे पहावयास मिळाले.

ऑनलाईन खरेदी

गुढीपाडव्यानिमित्त नागरिकांनी ऑनलाईन खरेदीही मोठ्या प्रमाणात केल्याचे पहावयास मिळाले. शहरात कूलर, एसीचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. कूलरचे भाव एक ते दीड हजारांपासून पंधरा ते वीस हजारांपर्यंत असल्याचे पहावयास मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT