Tembhurni News : एमआरपीपेक्षा जास्त दराने दारू विक्री File Photo
जालना

Tembhurni News : एमआरपीपेक्षा जास्त दराने दारू विक्री

टेंभुर्णी : बिअरबार चालकांकडून नियमांचे उल्लंघन, लक्ष देण्याची गरज

पुढारी वृत्तसेवा

Selling liquor at a price higher than MRP

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : जाफराबादा तालुक्यातील टेंभुर्णीसह परिसरातील बिअर बार चालकांनी मनमानी करून नियमांचे उल्लंघन जास्त दराने बिअर विक्री करत आहे. बार मालक नियमांचे पालन न करता जास्त पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असल्याने मद्य सेवन करणाऱ्यांना आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे.

स्थानिक प्रशासन योग्यरित्या काम करत नसल्यामुळे बार मालकांना मनमानी करण्याची संधी मिळत आहे. शासनाने कुठल्याही देशी-विदेशी दारू च्या किंमतीत वाढ केलेली नसताना मात्र टेंभुर्णी येथील बिअर बार असोसिएशनच्या पदधिकारी यांनी चक्क भाव फलक लावून मनमानी केली जात आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या एमआरपी नुसार थोड्या प्रमाणात शिल्लक पैसे घेण्यासाठी ग्रहाकांची हरकत नव्हती. परंतु बाटली पॅकींगी करताना एमआरपी १८० च्या बाटलीवर १६० रुपये असताना चक्क २३० रुपये भाव वाढ करून लुट केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे भोकरदन, जाफाबाद उत्पादक शुल्क अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत.

याबाबत एका जाणकारांनी तक्रार केली असताना याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे संबधित उत्पादक शुल्क विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. एका बार मालकानी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, संबंधित अधिकारी यांना दरमहा आर्थिक चिरीमिरी करावी लागते. यामुळेच भाव वाढवावे लागते असल्याचे एका बार चालकांने सांगितले.

सर्व्हिस चार्जच्या नावाखाली लूट

शासनाने ठरवून दिलेल्या नियमापणे मद्यपान करणार्यांना सुविधा उपलब्ध करून दिली जात नाही. दारू पिण्यासाठी लागणारा परवाना नसतो. बोगसगिरी करून मॅस्टर भरल्या जाते. शासकीय भावफलक नुसार विक्री केली जात नाही.

सव्हिस चार्ज म्हणून लुट लावली आहे. याकडे तात्काळ संबधित अधिकारी यांनी लक्ष वेधून मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी पाऊल उचलावे अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT