जालना ः येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले संत कबीर उच्च प्राथमिक विद्यालयातील कर्मचारी.  pudhari photo
जालना

Jalna school staff protest : प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

संस्था सचिवाविरुद्ध शिक्षक व कर्मचारी आक्रमक

पुढारी वृत्तसेवा

जालना : महाराष्ट्र सैनिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संत कबीर उच्च प्राथमिक विद्यालय संजय नगर या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संस्था सचिवांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आक्रमक झाले असून त्यांनी मंगळवारपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.

संस्था सचिवाकडून वारंवार होणारी छळवणूक थांबवावी, जुलै 2025 पासून नैसर्गिक पद्धतीने मिळणारी वार्षिक वेतनवाढ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्यात यावी, संस्थेने चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने केलेले शेषराव पांडुरंग गोरे यांचे निलंबन तत्काळ रद्द करावे , नारायण गोपीनाथ गव्हाड (शिक्षण सेवक) यांचा सेवा सातत्याचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करावा या मागण्यांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मराठवाडा शिक्षक संघाच्या पाठिंब्याने आमरण उपोषण केले.

25 फेब्रुवारी 2025 रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीचे सीसीटीव्ही फुटेज तत्काळ देण्यात यावे, खोटे गुन्हे दाखल करणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देणे यावर पावबंद घालावा, संत कबीर उच्च प्राथमिक विद्यालय संजय नगर जालना या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती करावी या व इतर अन्य मागण्याही करण्यात आल्या.

उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शालेय प्रशासन व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) या कार्यालयाची राहील असे निवेदनात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT