Sand worth Rs 25 lakh stolen from Godavari riverbed in Gondi
शहागड, पुढारी वृत्तसेवा अंबड तालुक्यातील गोंदी येथील गोदावरी नदीपात्रातील सिध्देश्वन मंदिर परिसरातून ५ लाख रुपयांची वाळू चोरी केल्याप्रकरणी महसूल विभागाच्यावतीने गुरुवारी रात्री २२ वाळूमाफियावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोंदी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसराततील गोदावरी नदीपात्राची अंबड तहसीलच्या गौण खनिज प्रतिबंधक पथकाने पाहणी केली. या दरम्यान त्या ठिकाणी अवैधरीत्या साठा केलेले वाळूचे या नदीपात्रात मोठ-मोठे खड्डे दिसून आले असून महसूल पथकावर पाळत ठेवून केनीच्या सहाय्याने सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गोदावरी नदी पात्रातून पाचशे ब्रास वाळू चोरीला केली.
या प्रकरणी वाळूमाफियांवर प्रकरणी मंडळ अधिकारी कृष्णा सांडुजी एडके यांनी पंचनामा करून या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून किशोर प्रभू खराद, विकास सुरेश खराद, मनोज सुरेश खराद, ऋषीकेश विशंभर खराद, डिगांबर रघुनाथ शिंदे, अजिनाथ दत्ता शिंदे, अक्षय राजाभाऊ बाणाईत तीन ढिगारे आढळून आले. अंदाजे ४० ते ५० ब्रास वाळू साठा हा आढळून आला. गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तडीपार असतानाही दोन बाळूमाफियांचा अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमधे समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात अवैध वाळू उपसा व इतर गुन्ह्यात आरोपी असलेल्या १० वाळूमाफियांविरुद्ध तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दहा जणांवर तडीपारची कारवाई केली होती.
यामध्ये सुयोग सोळुंके व गजू ऊर्फ गजानन गणपत सोळंके याचाही समावेश होता. तडीपार असतानाही गोंदी येथील सिद्धेश्वर पॉइंट गोदावरी नदीपात्रातून त्यांनी अवैध वाळू उपसा केला म्हणून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात काही दिवसांपूर्वी तडीपार असतानाही सुयोग सोळुंके याने एकाला मारहाणही केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तडीपार असतानाही वाळू माफियांचा या भागात मुक्त संचार असल्याचे समोर आले आहे.