तीन दिवसांत 28 वाहनांवर कारवाई; 5 लाख 88 हजारांचा दंड pudhari photo
जालना

Illegal mining transport : तीन दिवसांत 28 वाहनांवर कारवाई; 5 लाख 88 हजारांचा दंड

वायुवेग पथकाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविली.

पुढारी वृत्तसेवा

जालना : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने 11 ते 13 फेब्रुवारी दरम्यान अवैध गौण खनिज वाहतुक करणाऱ्या 28 वाहनांवर करवाई करण्यात आली. या करवाईत सुमारे 5 लाख 88 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांच्या वायुवेग पथकाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविली.

जालना जिल्ह्यातील विविध भागांत करण्यात आलेल्या या तपासणीत एकूण 28 वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान विनानंबर प्लेट असलेले टिप्पर तसेच विनापरवाना वाळू वाहतूक करणारी वाहने आढळून आली. त्यापैकी विनापरवाना वाळू वाहतूक करणारी दोन वाहने जप्त करून ती एसटी वर्कशॉप जालना व टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहेत.

संबंधित वाहनांवर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक भीमराज नागरे, अनिल कदम, निलेश अहिरे, शुभम मोटे व अक्षय पाटील तसेच सहा मोटार वाहन निरीक्षक श्रीमती सोळुंके, श्री. राजपूत, श्री. अर्शन खान आणि चालक घुले, पारिस्कर, निळे, नावकीकर, देवकर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध महसूल विभाग, पोलीस विभाग व परिवहन विभागाची संयुक्त कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT