Rs 27 lakh 15 thousand recovered from illegal water connection holders
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महानगरपालिकेकडून शहरात करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये तेरा हजार नळकनेक्शन अवैध असल्याचे निदर्शनास आले होते. त्यापैकी पाच हजार नळकनेक्शन धारकांना नोटीस देऊन महापालिकेने लोकअदालमधे बोलावले होते. यावेळी एक हजार नोटीसधारक लोकअदालतीत आले होते. त्यात ३७२ अवैध नळकनेक्शन धारकांनी ७ हजार ३०० रुपये भरले. त्यामुळे महापालिकेला एकाच दिवशी २७ लाख १५ हजार ६०० रुपयांची वसुली प्राप्त झाली.
जालना शहरात महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या अनधिकृत नळकनेक्शन शोध मोहिमेत १३ हजार नळ कनेक्शन अनधिकृत होते. १३ असल्याचे समोर आले हजार अनधिकृत नळ कनेक्शनधारकांपैकी पाच हजार अनधिकृत कनेक्शनधारकाना शनिवारी जालना जिल्हा व सत्र न्यायालय येथे तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. यावेळी एक हजार नोटीस मिळालेल्या नागरिकांनी लोकअदालतीत हजेरी लावली.
त्यापैकी ३७२ नागरिकांनी नळ कनेक्शनचे तडजोडीने दहा हजार रुपयांऐवजी ७ हजार ३०० रुपये भरले. साई एजन्सीमार्फत सुरू आहे. एजन् सीच्यावतीने करण्यात आलेल्या शोध मोहिमेत ३२ हजार घरी नळाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात २७हजार फॉर्मची पडताळणी पडताळणी करण्यात आली असता शहरात १३ हजार नळकनेक्शन अनधिकृत असल्याचे आढळून आले. या लोक अदालतीमधे मोठ्या संख्येने नोटीस दिलेले नागरिक उपस्थित राहीले असले तरी त्यापैकी ३७२ जणांनी तडजोडीने पैसे भरून नळ कनेक्शन अधिकृत करून घेतले. यातून महापालिकेला २७ लाख १५ हजार ६०० रुपये नळपट्टी करातून मिळाले.
जालना शहरात १३ हजार अनधिकृत नळ कनेक्शन आढळून आले. त्यापैकी पाच हजार नागरिकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. आता उर्वरित ८ हजार अनधिकृत नळधारकांना महापालिकेच्या कारवाईची प्रतीक्षा असल्याचे पहावयास मिळाले. पुढील कारवाईकडे लक्ष लागून आहे.