Ghansawangi : बकेटभर पाण्यात सर्जा-राजाची अंघोळ ! file photo
जालना

Ghansawangi : बकेटभर पाण्यात सर्जा-राजाची अंघोळ !

नदी-नाले कोरडे, पाण्याअभावी शेतकऱ्यांचा उत्साह मावळला

पुढारी वृत्तसेवा

Rivers and streams have run dry; farmers' enthusiasm has dampened due to the lack of water

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः घनसावंगी तालुक्यात पावसाअभावी सर्जा-राजाची अंघोळ बकेटभर पाण्यात उरकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने घनसावंगी तालुक्यातील नदी-नाले, ओढे, पाझर तलाव आणि छोटे जलसाठे कोरडेठाक असून, दुष्काळाच्या झळा आता शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या बैलपोळा सणालाही बसल्या आहेत.

पोळा म्हणजे शेतकरी आणि बैलांच्या नात्याचा जिव्हाळ्याचा दिवस. वर्षभर उन्हातान्हात शेतात राबणाऱ्या बैलांना या दिवशी अंघोळ घालून, शिंगांना रंग लावून, अंगावर झूल चढवून आणि गळ्यात घुंगरू बांधून सजविले जाते. त्यांची पूजा करून शेतकरी कृतज्ञता व्यक्त करतो.

मात्र यंदा पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे या परंपरेतही अडचणी निर्माण झाल्या आहेत. तालुक्यातील अनेक जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने बैलांना आंघोळ घालण्यासाठी पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

ज्या बैलांच्या साथीने शेतकरी वर्षभर काळ्या मातीत घाम गाळतो, त्याच बैलाच्या अंगावर पाणी टाकतानाही पाण्याचा हिशेब करावा लागत आहे. त्यामुळे यंदाचा बैलपोळा सण उत्साहापेक्षा दुष्काळाची वेदना, पाण्याची चिंता आणि पावसाची आस घेऊन साजरा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
- विकास तळपे, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT