Jalna News : रिव्हॉल्वरसह तलवारी जप्त; तीन आरोपी ताब्यात file photo
जालना

Jalna News : रिव्हॉल्वरसह तलवारी जप्त; तीन आरोपी ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

Revolver and swords seized; three accused taken into custody

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, एक देशी रिव्हॉल्वर तसेच दोन धारदार तलवारी असा ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.१९) करण्यात आली.

पोलिस अधीक्षक तेगवीर सिंह संधू यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई करण्यात आली. प्रथमेश बालाजी कदम (१९, रा. खरपुडी, जालना) हा गावठी पिस्तूल बाळगत असल्याचे आढळून आल्याने त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच राजेश दिपक पांजगे (२४, रा. मधुबन कॉलनी, जालना) याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा देशी रिव्हॉल्वर जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन बबन कसबे (२३, रा. खिस्ती कॅम्प, जालना) याच्याकडून तीन हजार रुपये किमतीच्या दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरुद्धही सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक तेगबिरसिंह संधु, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्ही शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि सचिन खामगळ, पोलिस उपनिरीक्षक राजेद्र वाघ, पोलिस जमादार रामप्रसाद पव्हरे, सॅम्युअल कांबळे, गोपाल गौशिक, लक्ष्मीकांम आडेप, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे यांच्यासह इतरांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT