Revenue and police should use modern technology Collector
जालना, पुढारी वृत्तसेवा : "गावाच्या सुरक्षेची पहिली जबाबदारी पोलिस पाटीलांवर असून त्यांनी आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आणि सामाजिक जबाबदारी जपत पार पाडावी," तसेच महसूल सेवक यांनी देखील कामकाज करतांना कायद्याची योग्य अंमलबजावणी करणे व गतिमानता व अचूकता येण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात पोलिस पाटील व महसूल भवन येथे महसूल सेवक यांना त्यांच्या पदाची जबाबदारी अधिकार आणि प्रशासकीय कार्यप्रणाली यासंबंधी सखोल ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्याच्या उद्देशाने, तसेच ग्रामपातळीवरील कामकाज करण्याकरिता सुलभता येण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित एक दिवसीय विशेष प्रशिक्षणादरम्यान त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपविभागीय अधिकारी परतूर पद्माकर गायकवाड, उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी, पोलिस निरीक्षक गुन्हे
प्रशिक्षणातून दिशा
प्रशिक्षणास जिल्हातील ३४५ पोलिस पाटील व २०० हून अधिक महसूल सेवकांची उपस्थित होते. उपस्थित प्रशिक्षणार्थीनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित उपक्रमामुळे गावपातळीवर काम करण्यास नक्कीच प्रोत्साहन व दिशा मिळेल असे मत व्यक्त केले.