Illegal Sand Extraction : महसुलची कारवाई; अवैध वाळू उपसा करणाऱ्या जेसीबीसह दोन ट्रॅक्टर जप्त File photo
जालना

Illegal Sand Extraction : महसुलची कारवाई; अवैध वाळू उपसा करणाऱ्या जेसीबीसह दोन ट्रॅक्टर जप्त

जाफराबादचे तहसीलदार मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई करत जेसीबीसह दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Revenue Action; Two tractors along with JCB seized for illegal sand extraction

टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवाः जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा गावच्या नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात उपविभागीय अधिकारी कार्तिक पानिग्रही आणि जाफराबादचे तहसीलदार मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई करत जेसीबीसह दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या वाहनांची किंमत अंदाजे ३० ते ३५ लाख रुपये आहे.

या प्रकरणी संबंधित जेसीबी आणि ट्रॅक्टर मालकांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी नय्युम पठाण, गजानन भालके, प्रभाकर शेनेवाड, महसूल सेवक राजेश खांडेभराड, पोलीस कर्मचारी दिनकर चंदनशिवे माने पोलिस पाटील प्रशांत बनसोडे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे परिसरातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तालुक्यात अवैध वाळू उपसा, अवैध मुरूम उत्खनन यावर धडक मोहीम सुरू केली आहे. हनुमंतखेडा येथे कारवाई केली असून, यापुढेही अशीच कारवाई सुरू राहील. कोणालाही सोडले जाणार नाही.
मंगेश साबळे, तहसीलदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT