Rename the city of Jalna to Janakpur
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहराचे नाव जनकपूर करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले की, कुंडलिका नदीच्या काठी वसलेले शहर असून ते मराठवाड्यातील प्रमुख व्यापारी केंद्र आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या नोंदीनुसार या शहराचे मूळ नाव जनकपूर होते. जनकपूर हे नाव राजा जनक व आपल्या सांस्कृतिक वारशाची आठवण करून देते आणि आजही स्थानिक लोकांच्या स्मरणात आहे.
१ मे १९८१ रोजी जिल्हा म्हणून स्थापन झालेले जालना आज स्टील, बियाणे व कृषी उद्योगाचे केंद्र म्हणून विकसित होत असताना हा वारसा जपणे उचित ठरेल. महानगरपालिकेचा ठराव, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, आणि रेल्वे, टपाल विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्याशी सल्ला मसलत करून केंद्रीय गृह मंत्रालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र द्यावे.
औरंगाबाद व उस्मानाबाद चे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव असे केलेले नामांतर वैध ठरविले आहे. ह्या प्रकारे अनुकूल अभिप्रायासह शासनाकडे पाठवावे आणि शासनाने उपरोक्त प्रक्रिया सुरू करून जालन्याचे नाव जनकपूर करावे, अशा निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब, शहराध्यक्ष सतीष पंच, उपाध्यक्ष प्रविण मोहता, अॅड. महेश धन्नावत, रविकांत जगधाने आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत. सुखदेव बजाज, अंकुश राऊत, सचिव