Jalna News : जालना बाजार समितीत ज्वारीला विक्रमी भाव file photo
जालना

Jalna Agricultural Produce Market Committee : जालना बाजार समितीत ज्वारीला विक्रमी भाव

७ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलने झाली विक्री

पुढारी वृत्तसेवा

Record price for sorghum at Jalna Agricultural Produce Market Committee

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारीला ७हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा विक्रमी भाव मिळाला आहे. दुष्काळी परिस्थितीत शेती मालाची आवक घसरल्याने यंदा सोयाबीन, तूरसह इतर पिकांना चांगले भाव मिळत असल्याचे चित्र आहे.

जालना जिल्ह्यात मागील वर्षी ज्वारीचा पेरा कमी होता. ज्वारीचा पेरा कमी झाल्याने गतवर्षी पासुन ज्वारीची आवक कमी होती. यंदा दुष्काळामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे नवीन ज्वारीची आवक होण्याची शक्यता धुसर झाली आहे. या पार्श्वभूमीवर ज्वारीची आवक कमी झालेली असतानाच मागणी वाढल्याचे चित्र आहे. शुक्रवारी जालना बाजार समितीत शेतकऱ्यांच्या ज्वारीला ७हजार २०० प्रति क्विंटल भाव मिळाला. विक्रमी भाव मिळालेल्या शेतकऱ्यांचा जालना कृषी उत्पन्न बाजार, समितीच्यावतीने सचिव भरतराव तनपुरे यांनी सत्कार केला.

यावेळी विक्रमी भाव मिळवून देणारे व्यापारी सुमती बोथरा यांचा वरिष्ठ लिपिक ज्ञानदेव (माऊली) चंद व भूषण बोथरा यांचा वरिष्ठ लिपिक नंदकिशोर गव्हाणे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी वरिष्ठ लिपिक राजेंद्र हिवाळे, योगेश शिंदे, विजयकुमार शिंदे, शेख आमजत, आर्जुन कुटे, व्यापारी संजय कानडे, रामेश्वर पा बोडखे, सुदाम मिसाळ, हमीद, जगदीश भुंबर, आकाश मोरे, रामेश्वर सोमाणी, मान्यवर उपस्थित होते.

जालना बाजार समितीत मूग व तुरीचे भावही ९ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहचले आहे. दुष्काळामुळे यंदा तुरीची आवकही घसरणार असल्याने मोंढ्यात तुरीच्या भावातही मोठी तेजी राहणर असल्याचे दिसत आहे. बाजारात शेती मालाचे भाव विक्रमी पातळीवर पोहचले असले तरी शेतकऱ्यांच्या शेतात दुष्काळामुळे पीक नसल्याने विक्रमी भाव शेतकऱ्यांसाठी अंगुर खट्टे है या म्हणीप्रमाणे आहेत.

जालना बाजार समितीत ज्वारीची आवक एक हजार क्विंटलची आहे. सध्या ज्वारीला मागणी चांगली आहे. सोयाबीनचे भावही साडेसात हजारांपर्यंत गेले आहेत. यंदा दुष्काळामुळे बाजार समितीत शेत मालाची आवक कमी आहे.
- संजय कानडे, अडत व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT