Jalna Police Special Drive : जालना पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सर विरोधात विशेष मोहीम; ११ वाहने ताब्यात

बुलेट चालकांमधे खळबळ, वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई, वाहतूक नियमांचे उल्लघंन टाळा
Jalna Police Special Drive
जालना : शहरात मॉडीफाईड सायलेन्सर बसविलेल्या दुचाकीवर पोलिसांनी कारवाई केली pudhari photo
Published on: 
Updated on: 

जालना : शहरात मोठ्या आवाजाचे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध जालना पोलिसांनी विशेष मोहीम राबवत ११ वाहने ताब्यात घेतली. शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे अनधिकृत सायलेन्सर बसवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

जालना शहरातील गांधी चमन, शनी मंदिर परिसर, मामा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान मॉडिफाइड सायलेन्सर बसविलेल्या एकूण ११ वाहनांची तपासणी करून ती ताब्यात घेण्यात आली. संबंधित वाहनांवरील अनधिकृत मॉडिफाइड सायलेन्सर काढून टाकण्यात आले असून, वाहनधारकांविरुद्ध नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Jalna Police Special Drive
Jalna Accident : गारटेकीत अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलिसांची कठोर भूमिका

शहरातील रस्त्यांवर काही वाहनचालकांकडून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरले जातात. अशा सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषण वाढण्याबरोबरच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि रुग्णांना मोठ्या आवाजाचा त्रास होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियम पाळले जावेत आणि अनधिकृत बदल केलेल्या वाहनांवर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी पोलिसांकडून ही मोहीम राबविण्यात आली.

वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Jalna Police Special Drive
Jalna Accident : गारटेकीत अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा जागीच मृत्यू

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहनांची आवश्यक कागदपत्रे व उपकरणे नियमानुसार ठेवावीत आणि ध्वनिप्रदूषण होईल असे बदल वाहनांमध्ये करू नयेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मोहिम सुरूच राहणार

जालना शहरातील नागरिकांची सुरक्षितता, शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जालना पोलीस कटिबद्ध असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेगबीररसंधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news