Jalna News : सोयाबीनला ७,२००, तुरीला ८,१०० रुपयांचा उच्चांकी भाव pudhari photo
जालना

Jalna News : सोयाबीनला ७,२००, तुरीला ८,१०० रुपयांचा उच्चांकी भाव

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत २,१३३ क्विंटल शेतमालाची आवक

पुढारी वृत्तसेवा

Record high prices of ₹7,200 for soybean and ₹8,100 for tur

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (दि. २२) विविध शेतीमालाची एकूण २ हजार १३३ क्विंटल आवक झाली. दिवसभरात गहू, ज्वारी, बाजरी, मका, तूर, हरभरा, सोयाबीन आदी पिकांचे व्यवहार झाले. सोयाबीनला प्रतिक्विंटल ७ हजार २०० रुपये, तर पांढऱ्या तुरीला ८ हजार १०० रुपयांचा कमाल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.

बाजार समितीच्या दैनंदिन आवक अहवालानुसार ज्वारीची सर्वाधिक ४७५ क्विंटल आवक झाली. ज्वारीला प्रतिक्विंटल २ हजार २०० ते ४ हजार ९०१ रुपये, सरासरी ३ हजार ५५० रुपये भाव मिळाला. गव्हाची ५६८ क्विंटल आवक होऊन त्याला २ हजार ५७५ ते २ हजार ७०० रुपये, सरासरी २ हजार ५८० रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची २७८ क्विंटल आवक झाली असून त्याला ५ हजार ६०० ते ७हजार २०० रुपये, सरासरी ७ हजार १५० रुपये दर मिळाला. पांढऱ्या तुरीची १४२ क्विंटल आवक झाली असून कमाल ८ हजार १०० रुपये, किमान ५ हजार ८०० रुपये आणि सरासरी ७ हजार ८०० रुपये भाव नोंदविण्यात आला.

हिख्या बाजरीची २६६ क्विंटल, लाल मक्याची २१३ क्विंटल, गावरान हरभऱ्याची १४७ क्विंटल आणि काळ्या हरभऱ्याची १० क्विंटल आवक झाली. गावरान हरभऱ्याला कमाल ६ हजार १०० रुपये, तर काळ्या हरभऱ्याला ६ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला. याशिवाय एरंडी, उडीद, सूर्यफूल आणि राईचेही व्यवहार बाजार समितीत पार पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT