Raosaheb Danve appointed as election in-charge
जालना, पुढारी वृत्तसेवा स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जालना महानगरपालिका निवडणुकीकरिता निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे माहिती दिली आहे. संघटन कौशल्य, निवडणूक व्यवस्थापनाचा अनुभव आणि कार्यकर्त्यांशी असलेली मजबूत नाळ लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
रावसाहेब दानवे हे आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम करतील. त्यांच्या नेतृत्व- ाखाली जालना महानगरपालिकेत भाजप अधिक बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल रावसाहेब पाटील दानवे यांचे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदन होत आहे. सर्व शक्तीनिशी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे.