Jalna News : आष्टीत सर्रास गुटखा विक्री; अन्न व औषध प्रशासनानचे दुर्लक्ष file photo
जालना

Jalna News : आष्टीत सर्रास गुटखा विक्री; अन्न व औषध प्रशासनानचे दुर्लक्ष

परतूर तालुक्यातील आष्टी गावात भेसळयुक्त खाद्यतेल तसेच प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

Rampant sale of Gutkha in Ashti; Food and Drug Administration turns a blind eye

आष्टी, पुढारी वृत्तसेवा: परतूर तालुक्यातील आष्टी गावात भेसळयुक्त खाद्यतेल तसेच प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत आहे. या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकातून होत आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात गुटखा विक्रेते, भेसळयुक्त दूध, पनीर, तुप व अन्नपदार्थ तसेच भेसळयुक्त खाद्यतेलाविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठे जप्त करण्यात येत असून, संबंधितांवर कारवाई केली जात आहे. मात्र, आष्टी परिसरात काही ठराविक व्यापारी अजूनही खुले खाद्यतेल आपल्या गोडाऊनातून लेबल युक्त डब्यातून भेसळ युक्त खाद्यतेल विक्री करत असल्याचे सांगितले जात आहे.

हे तेल काही ठराविक ग्राहक, हॉटेल चालक व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाच गोडाऊनमधून पुरविले जात असल्याची माहिती समोर येत आहे. रिकाम्या लेबल युक्त डब्यांमधून या तेलाची विक्री होत असल्याचाही आरोप केला जात आहे. तसेच तपासणीची शक्यता लक्षात घेऊन गोडाऊनमध्ये समोर रिकाम्या टाक्या ठेवून दिशाभूल केली जात असल्याचीही चर्चा आहे.

प्रतिबंधित गुटख्याचीही चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे सांगितले जात आहे. तपासणीसाठी येणारे अधिकारी अनेकदा छोट्या दुकानदारांकडे किंवा टपरीधारकांकडे चौकशी करतात; मात्र प्रत्यक्षात काही घाऊक पुरवठादारांकडून ठराविक दुकानदारांना गुटख्याचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप आहे.

गुटखा विक्रीवर कारवाई करा

ओळखीच्या ग्राहकांना कागदाच्या पुडीत बांधून गुटखा विकला जात असल्याचीही माहिती स्थानिक स्तरावर व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी. गावातील गुटखा विक्री बंद करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT