Rains destroy remaining Kharif crops
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले. या पावसाने खरिपाची पिके हाती लागण्याची उरली सुरली आशाही आता मावळली आहे.
खामखेडा व जाफराबाद शहर व तालुका परिसरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मागील महिनाभरापासून पाऊस सातत्याने हजेरी लावत आहे. कधी मध्यम तर कधी जोरदार स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीन, उडीद, कापूस, तूर यासह इतरही अनेक पिकांचे यापूर्वीच मोठे नुकसान झालेले आहे. शनिवारी दुपारपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली.