Mosambi Rate : मोसंबीचे दर २० हजारांवर; शंभर टनाची दररोज आवक File Photo
जालना

Mosambi Rate : मोसंबीचे दर २० हजारांवर; शंभर टनाची दररोज आवक

चांगल्या मालाला भाव; दिल्ली, कानपूर, कोलकाता येथून मोसंबीला मागणी

पुढारी वृत्तसेवा

Prices of citrus fruits at 20 thousand; Daily arrival of 100 tons

जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना मोसंबी मार्केटमधे बुधवारी ५ हजारांपासून २० हजार रुपये प्रतिटन या भावाने मोसंबीची विक्री झाली. मोसंबी मार्केटमधे सध्या १०० टनाची आवक असून दररोज जवळपास वीस ट्रक मोसंबी दिल्ली, कानपूर, कोलकाता, जयपूरसह इतर बाजारात पाठवली जात आहे.

जालना शहरातील नवीन मोंढ्यातील मोसंबी मार्केटमध्ये मोसंबीची दररोज आवक दररोज शंभर टन होत आहे. बुधवारी मोसंबीचे दर ५ हजार ते २० हजार रुपयांदरम्यान होती. पावसामुळे अनेक मोसंबी उत्पादकांना मोसंबी झाडावरून तोडण्यास उशीर झाल्याने ती पिवळी पडली आहे. पिवळी मोसंबी जास्त दिवस टिकत नसल्याने या मोसंबीला बाहेरगावी पाठविण्यात अडचणी येत आहेत.

बाजारातील ज्यूस सेंटरसह जवळपासच्या बाजारात मोसंबी पाठविली जात आहे. यंदा मोसंबीचे भाव तेजीत राहण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र यंदा पावसामुळे मोसंबीचे गणित बिघडवले आहे. मोसंबीचे भाव गुणवत्तेनुसार ५ हजार ते २० हजार रुपये प्रति टन आहेत.

मोंढ्यात दररोज १०० ते १२० मोसंबीची आवक होत आहे. जालना मोंढ्यातून बहुतांश माल उत्तरेतील दिल्ली, जयपूर, कोलकत्ता यांसारख्या बाजारात पाठवला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा मिळतो.

अतिवृष्टीमुळे नुकसान गंभीर संकटामुळे मोठ्या प्रमाणावर मोसंबी फळगळ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पन्न मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे.

उत्पादक अडचणीत

मोसंबी बागायतदार उत्पादन घटल्यामुळे व बाजारातील अनिश्चिततेमुळे अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे मोसंबीच्या झाडासह मोसंबी फळावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक ठिकाणी फळगळ होत असतानाच बुरशीचा प्रादुर्भावही झाला आहे. यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT