Price of pigeon pea (tur) at the Agricultural Produce Market Committee (APMC) stands at ₹10,450
जालना, पुढारी वृत्तसेवाः येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार, (दि. १७) रोजी शेतमालाची मोठी आवक पाहायला मिळाली. बाजारात नवीन सोयाबीनची ८,१६७ क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली असून, सोयाबीनला प्रति क्विंटल कमाल ७,४५३ रुपये तर सर्वसाधारण ६,९५० रुपये भाव मिळाला. तसेच पांढऱ्या तुरीला आणि हिरव्या मुगाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
बाजार समितीचे प्रशासक परमेश्वर वरखडे व सचिव भरत तनपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिवसभरात एकूण १०,७३३ क्विंटल विविध शेतमालाची आवक झाली असून ६ कोटी ५७ लाख २८ हजार ५५२ रुपयांचे एकूण मूल्यांकन झाले आहे. बाजारपेठेत हिख्या मुगाला प्रति क्विंटल १३,००० रुपये असा सर्वोच्च भाव मिळाला, तर चमकी मुगाची ५९ क्विंटल आवक होऊन त्यास सर्वसाधारण ९,१५० रुपये भाव मिळाला. पांढऱ्या तुरीची ९६ क्विंटल आवक झाली असून तिला कमाल १०,४५० रुपये तर सर्वसाधारण १०, २०० रुपये दर मिळाला.
याशिवाय, शाळू ज्वारीला कमाल ६,७०० रुपये, गावरान हरभऱ्याला ७,१२५ रुपये, तर काळ्या उडदाला कमाल ९,३०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. रेशीम कोशाची (पांढरा) १ क्विंटल आवक झाली असून त्यास कमाल ६०,५०० रुपये असा उच्चांकी दर नोंदवला गेला. गव्हाची ३२५ क्विंटल आवक होऊन त्यास २,९०० रुपये सर्वसाधारण भाव मिळाला. यामुळे बाजारात शेतमालाला चांगला दर मिळाल्याचे दिसून आले.