Cold Weather : उबदार कपड्यानी आठवडे बाजार गरम File Photo
जालना

Cold Weather : उबदार कपड्यानी आठवडे बाजार गरम

स्वेटर, जॅकेट, मफलरसह मखमली उबदार कपडे खरेदीला पसंती

पुढारी वृत्तसेवा

Preference is given to buying warm velvet clothes including sweaters, jackets, mufflers

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचे आगमन उशिरा जाणवू लागली आहे. नवनवीन डिझाईनच्या उबदार कपड्यांसह विविध फॅशनच्या मफलर व मखमली स्टॉल्सच्या खरेदीचा सध्या ट्रेण्ड दिसून येत आहे. थंडीपासून बचाव करण्याकरिता विविध प्रकारच्या गरम कपड्यांच्या खरेदी करीत असल्याचे चित्र आठवडे बाजारात दिसून आले.

हिवाळा येताच उबदार कपड्यांचा बाजारही गरम होण्यास सुरू होतो. बाजारात जेथे सुंदर-सुंदर स्वेटर व जॅकटची बहार असते, तसेच सिल्कचे स्टॉल मुलींचे केंद्रबिंदू आहे. हे स्टॉल निरनिराळ्या रंगात उपलब्ध असतात. दुचाकी चालवताना किंवा थंडीत चेहऱ्याला कोरडी आणि निस्तेज होण्यापासून बचावासाठी मुली या स्टॉल्सचा प्रयोग करतात. सिल्क स्टॉल सूट सलवार, जींस अशा सर्व वेशभूषेत तरुणींना वेगळाच लुक देतो.

बाजारात हे स्टॉल १०० रुपयांपासून पाचशे ते हजार रु पयांपर्यंत उपलब्ध आहेत. ड्रेसशी मॅचिंग किंवा आपल्या आवडत्‍या रंगाच्या स्टॉलचा वापर करून आपल्या ड्रेसची शोभा वाढवविण्यासाठी मुलींकडून नवनवीन स्टॉल्सच्या खरेदीला पसंती मिळत आहेत. थंडीमध्ये लहान मुले व ज्येष्ठांची जास्त काळजी घेतली जाते. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत लोकरीचे कपडे परिधान केले जातात.

खासकरून विविध रंगसंगती असलेली वस्त्रे वापरण्याकडे महिलांचा कल वाढू लागला आहे. आपल्या ड्रेसप्रमाणे आपला थंडीचा पेहराव असावा, असे महिलांना वाटते. तर पुरुषांनाही इतरांपासून आपला लूक वेगळा दिसावा यासाठी ट्रेण्डी जॅकेट व मफलर सारख्या उबदार कपडय़ांच्या खरेदी करण्याची इच्छा असल्याने आपल्याला हवे तसे आणि व्यक्तीमत्वात भर घालणाऱ्या ऊबदार कपडय़ांना तरुणांची पसंती मिळत आहे.

माफक दरात वस्तू

५० रूपयांपासून जवळपास पाच हजार रुपयांच्या जॅकेटपर्यंत वस्तू बाजारात आहेत. तीनशे ते पाचशे रुपयांच्या माफक दरातही योग्य वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या हातमोज्यांपासून ते विविध लहान-लहान सुंदर बंद गळयाचे जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. मऊ कापसाचे सुंदर स्वेटर आणि क्विक ड्रायची मुलांचा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी खरेदी केली जात आहे.

विविध डिझाईनचे स्वेटर

लहानापासून ते ज्येष्ठांसाठीचे विविध डिझाईनचे स्वेटर व जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. जेन्ट्स, लेडीज स्वेटर, मफलर, स्कार्फ, लेस्कोटी, स्वेटकोटी, कुर्तापॅटर्न, सलवार सुट, जॅकेट, टी-शर्ट अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT