पाणी आले की वीज पुरवठा गुल; हमालपुऱ्यातील नागरिक त्रस्त Pudhari News Network
जालना

पाणी आले की वीज पुरवठा गुल; हमालपुऱ्यातील नागरिक त्रस्त

अभियंता सचिन उकंडे यांचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

Power Goes Out Whenever the Water Supply Arrives; Residents of Hamalpura Distressed

जालना, पुढारी वृत्तसेवा : गत दोन महिन्यांपासून जालना शहरातील हमालपुरा भागात कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने वीजेवर चालणारी उपकरणे पूर्ण क्षमतेने चालत नाही. परिणामी, दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याने परिसरातील नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, महानगरपालिकेच्या नळाला पाणी येताच वीज पुरवठा खंडित होतो, अशी गंभीर समस्या नागरिकांनी मांडली आहे. त्यामुळे पाणी भरताना मोटर चालू होत नाही आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या भागात २० ते २५ घरांना नियमित वीजपुरवठा मिळत नाही.

ही समस्या मागील दोन महिन्यांपासून सुरू असून, वारंवार तक्रारी करूनही (महावितरण प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. गंभीर बाब म्हणजे संबंधित अभियंता नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असून, वारंवार संपर्क करूनही योग्य प्रतिसाद दिला जात नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. कर्मचाऱ्यांकडून 'शेवटचा वीज खांब असल्यामुळे समस्या आहे' असे कारण सांगितले जाते.

नागरिकांनी इशारा दिला आहे की, लवकरात लवकर समस्या सोडवली नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल. शाखा अभियंता सचिन उकंडे यांनी कर्मचाऱ्यांना पाठविले असता कर्मचाऱ्यांना नेमका प्रश्न काय हेच कळला नसल्याने या भागतील परिस्थिती 'जैसे थे' आहे.

नळाला पाणी आल्यावर परिसरातील विद्युत पंप सुरु झाल्याने विद्युत पुरवठ्यावर मोठा दाब येतो त्यामुळे ही समस्या येते. लवकरच या भागातील पाहणी करुन आकडे काढणार आहे.
-सचिन उकंडे, अभियंता, एमएसईबी, जुनी एमआयडीसी, जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT