Police seized gutkha worth two and a half lakh rupees
बदनापूर, पुढारी वृत्तसेवाः बदनापुर तालुक्यातील राजुर-फुलंब्री मार्गावर असलेल्या दाभाडी येथे बदनापुर पोलिसांनी कारमधुन जाणारा गुटखा शनिवारी जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी २ लाख ४९ हजार ३६० रुपयांचा गुटखा व कार असा साडे बारा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
राजूर येथून फुलंब्री कडे जाणाऱ्या रस्त्यावरील डोंगरगाव फाटा येथे कारचा अपघात झाला असुन या कारमधे प्रतिबंधीत गुटखा असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी सहकाऱ्यांसह दाभाडी येथे जाऊन सदर कारचा पाठलाग करुन ती दाभाडी जवळ पकडली असता पोलिसांनी सदर कार (क्र एमएच २१ -५२०६) ची पाहणी केली असता त्या मध्ये २ लाख ४९ हजार ३६० रुपये किमतीचा गुटखा मिळुन आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
त्यातील एका आरोपीस अटक करण्यात आली असल्याची माहीती मिळाली आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल , अप्पर पोलिस अधिक्षक आयुष नोप-ाणी, उपविभागीय पोलिस अधिकार अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दासार, नितिन वाघमारे, दीपक कराढ, पूनंसिंग गोळवालयांनी केली. गुटखा घेउन जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याची माहीती समोर आली.
कारवाया नंतरही गुटखा विक्री सुरूच
जालना व बदनापुर तालुक्यात पोलिसांच्यावतीने अवैध गुटख्यावर कारवाया होत असतांनाच दुसरीकडे अवैध गुटख्याची विक्री जोरात असल्याचे चित्र आहे. गुटख्याच्या अवैध व्यवसायात मिळणाऱ्या पैशामुळे अनेक जण या व्यवसायाकडे वळतांना दिसत आहेत.